Sunil Gavaskar Criticizes Rohit Sharma: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखताना अंतिम फेरीत धडक दिली आहे. भारत या स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे आणि फायनलमध्ये त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. न्यूझीलंडला साखळी फेरीत भारताकडून हार पत्करावी लागली आहे, परंतु आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये किवींनी दोनवेळा पराभूत केले आहे. ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर IND vs NZ Final मॅच होणार आहे.