How much prize money did India win in Champions Trophy 2025? भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदाचा १२ वर्षांचा दुष्काळ संपवला. त्याचसोबत २५ वर्षांपूर्वी न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिलेली जखमही आज भरून काढली. भारताने ४ विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत करताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेचे जेतेपद नावावर केला. मागच्या वर्षी भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा रोहित हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. या जेतेपदासह भारताने मोठी बक्षीस रक्कमही जिंकली.