IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Sai Sudharsan injury before New Zealand tour: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. भारताचा युवा स्टार फलंदाज साई सुदर्शन याला रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत खेळताना दुखापतीची समस्या जाणवली.
Sai Sudharsan injury before New Zealand tour

Sai Sudharsan injury before New Zealand tour

Updated on: 

India vs New Zealand tour injury update: भारतीय संघ न्यूझईलंड दौऱ्यासाठी रवाना होण्याच्या एक दिवस आधीच संघाला धक्का बसला आहे. भारताचा आघाडीच्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन ( Sai Sudharsan ) याला दुखापत झाली आहे. रणजी करंडक स्पर्धेत तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करताना राजस्थानविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुखापतीमुळे त्याला चालणेही अशक्य झाले होते आणि त्याला सपोर्ट स्टाफच्या मदतीने मैदानाबाहेर जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com