IND vs NZ Final Live: तो आज निवृत्त होतोय! विराट कोहलीला ते समजलं... त्याच्या कृतीतून मिळाले संकेत; Photo Viral

India vs New Zealand Champions Trophy Final 2025: भारतीय संघातील एका खेळाडूसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल वन डे कारकीर्दितील शेवटची असण्याची शक्यता बळावली आहे.
Speculations on Ravindra Jadeja’s ODI Retirement
Speculations on Ravindra Jadeja’s ODI Retirementesakal
Updated on

Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांना निवृत्तीचे वृत्त ऐकायला मिळण्याची शक्यता बळावली आहे. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात विराट कोहलीच्या एका कृतीने निवृत्तीचे वृत्त खरं ठरतंय की काय, असे चित्र समोर आले आहे. दोन दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि हे विराटला आधीच माहित असल्याने त्याने त्याला मिठी मारली होती. आजही भारतीय खेळाडूच्या बाबतीत विराटने असेच काही केले आणि त्यामुळे तो निवृत्त होतोय, हे स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com