Gurnoor Brar added to India’s Test squad; Kuldeep Yadav released
esakal
Why was Kuldeep Yadav released from India's Test squad? भारताच्या कसोटी संघात अचानक बदल करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून कुलदीप यादवला बाहेर केले गेले आहे. बीसीसीआयने शनिवारी हा निर्णय जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कुलदीपच्या जागी संघात वन डे मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या गुरनूर ब्रारचा ( Gurnoor Brar) समावेश केला गेला आहे. दरम्यान, यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत वेलिंग्टनमध्ये कसोटी संघाच्या सदस्यांमध्ये सामील झाला आहे.