Washington Sundar Catch and Ravindra Jadeja Run- Out.jpgSakal
Cricket
IND vs NZ: वॉशिंग्टनने पळत येत घेतला अफलातून कॅच, तर जड्डूच्या भारी रनआऊटनं संपली न्यूझीलंडची इनिंग; पाहा Video
Washington Sundar Catch and Ravindra Jadeja Run- Out: पुणे कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरने पळत येत घेतलेल्या कॅचने आणि रविंद्र जडेजाने हुशारी दाखवत केलेल्या रनआऊटने सर्वांचे लक्ष वेधले.
India vs New Zealand 2nd Test at Pune: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असून तिसऱ्या दिवशी भारताचे क्षेत्ररक्षण चांगले झाले. त्यातही वॉशिंग्टन सुंदरने घेतलेला झेल आणि रविंद्र जडेजाच्या चपळाईने सर्वांची वाहवा मिळवली.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात ५ बाद १९८ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली होती. त्यावेळी टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स फलंदाजी करत होते.
ब्लंडेल आणि फिलिप्सने सुरुवात चांगली केली होती. पण ब्लंडेलला ४१ धावांवर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले, तर त्याने मिचेल सँटेनरलाही ४ धावांवर जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केले. टीम साऊदीचा अडथळा आर अश्विनने दूर केला. त्याचा झेल रोहित शर्माने घेतला.

