India vs Pakistan Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यासाठी पाकिस्तान सज्ज होत असताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी प्रमुख आणि क्रिकेटपटू रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी पाकिस्तानसाठी तापदायक ठरणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. त्यांच्या मते पाकिस्तानला अंडरडॉग समजणे हे संघाच्या फायद्याचे ठरणारे आहे. डॉननमधील त्यांच्या स्तंभात, राजा यांनी सुचवले की भारताच्या टॉप-ऑर्डरमधील कमकुवतपणा आणि धोरणात्मक गोलंदाजीतील बदल दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकतो.