
Sunil Gavaskar on Pakistan Team: भारताविरुद्धच्या पराभवानंतर चोहोबाजूने टीका होत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जखमेवर भारताचे महान दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मीठ चोळले आहे. भारताच्या ब संघालाही हरवणे या पाकिस्तानी संघाला कठीण जाईल, असे भाष्य गावसकर यांनी केले.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेते असलेल्या पाकिस्तानचा सलग दोन सामन्यांत पराभव झाला. परिणामी, स्पर्धा सुरू होऊन सहा दिवस होत नाहीत तोपर्यंत त्यांना गाशा गुंडाळावा लागला. रविवारी भारताविरुद्ध झालेला पराभव तर त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.