India A Women register a commanding 8-wicket win with 59 balls remaining against Pakistan A Women in Asia Cup Rising Stars
esakal
Asia Cup Rising Stars women cricket latest update Marathi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दोन ब्लॉकबस्टर सामने होणार आहेत आणि त्यातल्या पहिल्या लढतीत भारताने बाजी मारली आहे. सायंकाळी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील लढतीतही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ बाजी मारेल, असा चाहत्यांना विश्वास आहे. आशियाई रायझिंग स्टार्स महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. भारतीय महिलांनी ८ विकेट्स व ५९ चेंडू राखून पाकिस्तानला पराभूत करताना उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.