IND vs PAK: भारत पाकिस्तान सामना आज; किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार LIVE?

INDIA VS PAKISTAN LIVE STREAMING DETAILS: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३० ऑक्टोबरला हॉन्ग कॉन्ग सिक्सेसमध्ये सामना होणार आहे. सामना किती वाजता सुरू होणार, LIVE कुठे पाहता येणार आणि भारतीय संघात कोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या.
INDIA VS PAKISTAN LIVE STREAMING DETAILS

INDIA VS PAKISTAN LIVE STREAMING DETAILS

esakal

Updated on: 

INDIA VS PAKISTAN LIVE STREAMING DETAILS: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना असला, तरी हा सामना महत्त्वाचाच असतो. अशीच मेजवानी क्रिकेट चाहत्यांना ३० ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. एकीकडे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना खेळवला जाणार आहे, तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असणार आहेत.

या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व क्रुणाल पंड्या करणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना हॉन्ग कॉन्ग सिक्सेस स्पर्धेचा असणार आहे.

Loading content, please wait...