Gautam Gambhir congratulates Harshit Rana after the IND vs SA 3rd T20I
esakal
IND vs SA 3rd T20I Gautam Gambhir Harshit Rana viral video : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर गौतम गंभीरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे नेटिझन्स खवळले आहेत. धर्मशाला सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभाव पाडला. दक्षिण आफ्रिकेचा डाव संपला तेव्हा सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतत होते. गंभीर त्याच्या जागी उभा राहिला आणि त्याने इतर खेळाडूंचे कौतुक केले, परंतु हर्षित राणा येताच तो पुढे आला आणि त्याच्या पाठीवर थाम मारली.