
IND vs SA final Women's U19 T20 World Cup : पुरूषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत व दक्षिण आफ्रिकेमध्ये फायनलचा सामना झाला होता. ज्यामध्ये भारताने बाजी मारली व वर्ल्ड कप आपल्या नावे केला. उद्या २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा भारत व दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने येणार आहेत.