Prasidh Krishna breaks 146-run partnership against Sri Lanka
Niroshan Dickwella Sonal Dinusha 146 run partnership Galle Test : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमानांनी एकही विकेट न गमावता भारताला सडेतोड उत्तर दिले. ४६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ ९० धावांवर माघारी पाठवून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड घेतली होती. पण, निरोशान डिकवेला व सोनल दिनुषा ही जोडी शड्डू ठोकून उभी राहिली. गोलंदाजीत बदल करूनही हे फलंदाज भारताला दाद देत नव्हते, अशा वेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) राखून ठेवलेला गोलंदाज पुन्हा आणला. शुभमन गिलने जुना चेंडू त्याच्या हाती दिला आणि त्याने १४६ धावांची ही भागीदारी तोडून भारताला मोठे यश मिळवून दिले.