Yashasvi Jaiswal : मी तुला IPLमध्ये घेऊन जाईन! यशस्वीने live मॅचमध्ये श्रीलंकन फलंदाजाला दिली ऑफर, Video ने खळबळ

Yashasvi Jaiswal and Niroshan Dickwella chat viral video: भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकन फलंदाज निरोशन डिकवेला यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यादरम्यान दोघांमध्ये मैदानावर हलकाफुलका संवाद रंगला.
Yashasvi Jaiswal and Niroshan Dickwella chat viral video

Yashasvi Jaiswal talks to Sri Lankan batsman during live match

esakal

Updated on: 

Yashasvi Jaiswal tells Niroshan Dickwella I’ll take you to IPL: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवून श्रीलंकेविरुद्धच्या ( IND vs SL ) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्यात २११ धावा ( १६७ व ४४) धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. फिरकीपटू मानव सुथारने सामन्यात १० विकेट्स घेऊन आपली छाप पाडली. पण, या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय. यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा श्रीलंकेच्या निरोशन डिकवेला याला IPL मध्ये घेऊन जाईन असे सांगताना ऐकू येतोय. या दोन्ही खेळाडूंमधील मजेशीर संवाद सध्या नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठऱला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com