Dhruv Jurel century in India vs Sri Lanka 2nd Test
esakal
Dhruv Jurel and Rishabh Pant partnership against Sri Lanka 2nd : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी केली. देवदत्त पडिक्कलनंतर ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel) यानेही खणखणीत शतक झळकावले. रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि कर्णधार शुभमन गिल यांनी अर्धशतक झळकावताना श्रीलंकेच्या गोलंदाजांना हैराण केले. पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेला रिषभ दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीला आला अन् वादळासारखा घोंगावला... त्याने अन् ध्रुवने मिळून सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी करताना संघाला पाचशे धावांपर्यंत पोहोचवले.