IND vs SL: यशस्वी जैस्वालचा श्रीलंकन गोलंदाजाशी वाद; हेल्मेटचा संपर्क, आता कारवाई होणार का? ICC चा नियम काय सांगतो?

YASHASVI JAISWAL CLASHES WITH SRI LANKAN BOWLER: भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि विश्वा फर्नांडो यांच्यात वाद झाला. या दरम्यान जैस्वालच्या हेल्मेटचा फर्नांडोच्या कपाळाला संपर्क झाला. आता ICC च्या नियमानुसार कारवाई होणार का?
YASHASVI JAISWAL CLASHES WITH SRI LANKAN BOWLER

YASHASVI JAISWAL CLASHES WITH SRI LANKAN BOWLER

esakal

Updated on

YASHASVI JAISWAL CLASHES WITH SRI LANKAN BOWLER: भारत आणि श्रीलंका (ind vs sl)यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमधील सिंहली स्पोर्ट्स क्लबवर रविवारी (२३ ऑगस्ट) सुरू झाला आहे. मात्र, पहिल्याच सत्रात मैदानावर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज विश्वा फर्नांडो यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

यशस्वी जैस्वाल ४५ धावांवर बाद झाल्यानंतर मैदानावर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. श्रीलंकेचा गोलंदाज विश्वा फर्नांडोने विकेट घेतल्यानंतर केलेल्या इशाऱ्यावर जैस्वाल चांगलाच संतापला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी जैस्वालच्या हेल्मेटचा फर्नांडोच्या कपाळाला संपर्कही झाला. त्यामुळे आता जैस्वालवर आयसीसीकडून कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com