Team India departs for Sri Lanka without Sai Sudharsan
esakal
Team India departs for Sri Lanka without Sai Sudharsan: भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने श्रीलंकेत दाखल होणार आहे. पण, या मालिकेपूर्वी भारताला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे, तर आज रवाना झालेल्या संघासोबत एक स्टार फलंदाज न दिसल्याने त्याच्याही खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाले आहे.