IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

Sai Sudharsan ruled out of India vs Sri Lanka Test series: श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यानंतर आता स्टार फलंदाजही मालिकेतून बाहेर झाला आहे.
Sai Sudarshan ruled out of Sri Lanka Test Series.

Sai Sudarshan ruled out of Sri Lanka Test Series.

Updated on

India injury concerns ahead of Sri Lanka Test series 2026: भारतीय संघातील दुखापतीची मालिका काही केल्या संपत नाहीए... जसप्रीत बुमराहने याच कारणामुळे मालिकेतून माघार घेतली आहे, तर वॉशिंग्टन सुंदर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्यात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत-श्रीलंका यांच्यातली कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि त्या मालिकेतून स्टार फलंदाजाने माघार घेतली आहे. हा फलंदाज आज श्रीलंकेत दाखल होणे अपेक्षित होता, परंतु त्याच्या माघारीचे वृत्त समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com