IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

Sarfaraz Khan most likely to replace Sai Sudarshan : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात पुन्हा एकदा निवडीवरून चर्चा रंगली आहे. साई सुदर्शनच्या माघारीनंतर आता त्याच्या जागी कोणत्या फलंदाजाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत सरफराज खानचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.
Sarfaraz Khan likely to replace Sai Sudharsan in India Test squad

Sarfaraz Khan likely to replace Sai Sudharsan in India Test squad

esakal

Updated on

So who is replacing Sai Sudharsan in the Test squad? भारतीय संघाचा स्टार डावखुरा फलंदाज बी साई सुदर्शन याने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे साई सुदर्शनला ही माघार घ्यावी लागली. श्रीलंकेविरुद्धच्या ( IND vs SL ) कसोटी सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला खेळणार होता, परंतु पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने त्याला मालिकेला मुकावे लागले. देवदत्त पडिक्कलने ( Devdutt Padikkal) सराव सामन्यात शतक झळकावून या जागेसाठी दावा ठोकला आहे, परंतु निवड समिती आणखी एका फलंदाजाचा विचार करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com