IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

India vs Sri Lanka Test series latest update: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियातील एका खेळाडूवर दबाव वाढला आहे. टीम मॅनेजमेंटने त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे.
Dhruv Jurel under pressure ahead of India vs Sri Lanka 1st Test

Dhruv Jurel under pressure ahead of India vs Sri Lanka 1st Test

esakal

Updated on

Gautam Gambhir ultimatum to indian batter before Sri Lanka Test series : गौतम गंभीरला त्याचे मुख्य प्रशिक्षक टिकवायचे आहे आणि त्याला द्विदेशीय मालिकेत संघाची कामगिरी उंचावून दाखवायची आहे. गौतमच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही उंचावला. पण, जेव्हा द्विदेशीय मालिकांचा विचार होतो, तेव्हा गौतमला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तो भारतीय खेळाडूंवर दबाव वाढवत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडवली आहे. भारत-श्रीलंका कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होतेय आणि ही मालिका एका फलंदाजासाठी शेवटची ठरू शकते. कारण, गौतमने त्याला कामगिरी चांगली कर नाहीतर घरचा रस्ता धर.. असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com