Devdutt Padikkal fifty in India vs Sri Lanka XI warm-up match
India vs Sri Lanka Cricket XI Warm Up: श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा सराव सामना सुरू आहे. या सामन्यात देवदत्त पडिक्कलने शानदार अर्धशतक झळकावत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर भारत अडचणीत असताना पडिक्कलने संयमी फलंदाजी करत डाव सावरला. त्याने ५६ धावांची खेळी करत आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली. मात्र, या अर्धशतकानंतरही पहिल्या कसोटीत पडिक्कलला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे सोपे दिसत नाही.