

Ravindra Jadeja Mimics Kuldeep Yadav's Bowling Action
esakal
Ravindra Jadeja Mimics Kuldeep Yadav's Bowling Action: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया सराव सामन्यात आपली तयारी करत आहे. या सराव सामन्यादरम्यान भारतीय संघातील एक मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे. जडेजाचा हा अंदाज पाहून शेजारी बसलेल्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही आपलं हसू आवरता आलं नाही.