why is Shubman Gill not batting in India warm-up match
esakal
Yashasvi Jaiswal dismissed for duck in warm-up match: श्रीलंका क्रिकेट एकादश संघाने पहिला डाव ८ बाद ३६३ धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताला दुसऱ्या चेंडूवर धक्का बसला. यशस्वी जैस्वाल खाते न उघडताच माघारी परतला. आता तरी शुभमन गिल फलंदाजीला येईल असे वाटले होते, परंतु मैदानावर उपस्थित गिलने ते टाळले. तो फिजिओसोबत मैदानावर दिसला आणि चाहत्यांना तो सराव सामन्यात फलंदाजीला येईल असे वाटले होते. पण, तसे काहीच झाले नाही. तो नेट्सकडेही गेला, परंतु त्याने दूरूनच अन्य फलंदाजांना सराव करताना पाहणे योग्य समजले.