IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Rohit Sharma Century : वेस्ट इंडिजने उभारलेल्या ४०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक शतके झळकावत विंडीज गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
Rohit Sharma and Shubman Gill smashed centuries

Rohit Sharma and Shubman Gill smashed centuries

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News : रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारताच्या विजयाचा पाया भक्क करताना पहिल्या विकेटसाठी २०० हून अधिक धावा जोडल्या. वेस्ट इंडिजच्या ४०५ धावांचा पाठलाग करताना रोहित-शुभमन यांनी जशी सुरुवात केली, ती पाहून पाहुणे गांगरले. शुभमन आणि रोहित या दोघांनी वैयक्तिक शतक झळकावले आणि विक्रमी भागीदारी केली. रोहितने ७२ चेंडूंत वन डेतील त्याचे ३५ वे शतक पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com