Shubman Gill second consecutive ODI century against West Indies
esakal
India vs West Indies 2nd ODI Marathi Cricket News : फलंदाजांसाठी नंदनवन खेळपट्टीवर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.. वेस्ट इंडिजच्या ४०५ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी विंडीज गोलंदाजांना रडवले. दोघांनी एकामागून एक विक्रमांना गवसणी घातली. रोहितने आजच्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये असा एक पराक्रमक केला, जो यापूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांनाच करता आलेला आहे. शिवाय त्याने महान फलंदाज सचिनला याच विक्रमात मागे सोडून विराटच्या मागे दुसरे स्थान पटकावले.