West Indies chase down 250-run target against India in 2nd T20I
India vs West Indies 2nd T20I Marathi Cricket News: गोलंदाजांच्या चिंधड्या कशा उडवल्या जातात, हे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाहायला मिळाले. भारताच्या २४९ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजने ५८ धावांत ३ फलंदाज गमावले खरे, परंतु त्यांनी त्यांचा इंगा दाखवला. षटकारांचा नुसता धो धो पाऊस पाडताना त्यांनी सामन्यात विक्रमी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. Shai Hope ने नाबाद शतक झळकावले आणि विंडीजचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग ठरला.