Mohammed Siraj highest wicket taker in Tests 2025
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket Update : वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या कसोटीत फॉलो ऑन स्वीकारूनही दुसऱ्या डावात आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांसमोर दुसऱ्या डावात विंडीजच्या फलंदाजांनी आव्हान उभे केले. जॉन कॅम्बेल व शे होप यांच्या शतकांनी विंडीजला आघाडी मिळवून दिली. शे होपने ८ वर्षानंतर कसोटीत शतक झळकावले आणि डोईजड होऊ पाहणाऱ्या या फलंदाजाला मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) भन्नाट चेंडूवर त्रिफळाचीत केले. या विकेटसह सिराजने मोठा विक्रम नावावर केला.