Sai Sudharsan’s brilliant catch in IND vs WI 2nd Test leaves fans in awe
esakal
India vs West Indies 2nd Test Marathi Cricket News : वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत भारताच्या ५१८ धावांचा पाठलाग करताना २१ धावांवर पहिला धक्का बसला. जॉन कॅम्बेल व तेजनारायण चंद्रपॉल यांनी सावध खेळ करताना ७ षटकं खेळून काढली. पण, कर्णधार शुभमन गिलने फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी आणले अन् साई सुदर्शनने ( Sai Sudharsan’s Stunning Catch ) अविश्वसनीय झेल घेऊन विंडीजला धक्का दिला. कॅम्बेल १० धावावंर बाद झाला, परंतु सुदर्शनच्या या अविश्वसनीय झेलची चर्चा रंगलीय.