

IND vs WI 4th T20
esakal
IND VS WI 4TH T20 LIVE STREAMING: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात दोन्ही संघांच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असेल. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-२० सामना कधी आणि कुठे होणार? हा सामना किती वाजता सुरू होईल? तसेच सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार? जाणून घेऊया.