

SANJU SAMSON REVEALS TURNING POINT
esakal
SANJU SAMSON REVEALS TURNING POINT: भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात २४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी होती, मात्र ती हुकली. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नेमका कुठे मागे पडला आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता, याबाबत संजू सॅमसनने भाष्य केलं आहे.