Ishan Kishan
esakal
India vs West Indies 5th T20I Marathi Cricket News: पावसामुळे ९-९ षटकांच्या या सामन्यात इशान किशनचा ( Ishan Kishan) जलवा पाहायला मिळाला. सायंकाळी ७ वाजता सुरू होणे अपेक्षित असलेल्या सामन्याचा पहिला चेंडू सव्वा नऊ वाजता पडला. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय पहिल्याच षटकात योग्य ठरला. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर इशानचे वादळ चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंगावले. त्याने वादळी खेळीसह एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले.