

India vs West Indies 5th T20I Marathi Cricket News: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पाचव्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता आणि अखेर आता विश्रांती घेतली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाने विश्रांती घेतली असून सामना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसामुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागल्यानंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेचा निकाल ठरवणाऱ्या लढतीसाठी सुधारित वेळ जाहीर करण्यात आली आहे.