Why Gautam Gambhir is not coaching India in Zimbabwe
esakal
Who is Team India head coach against Zimbabwe? इंग्लंडमधील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेत दाखल झाला, परंतु त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) कुणालाच नाही दिसला. भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात झाली आणि भारतीय गोलंदाजांनी यजमानांचा निम्मा संघ ६४ धावांत तंबूत पाठवला आहे. पण, गौतम गंभीर या मालिकेत संघासोबत का नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतोय. गौतमच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण पार पाडतोय.