IND vs ZIM 3rd T20I : कर्णधार गिल टेन्शनमध्ये! तीन खेळाडूंच्या 'एन्ट्री'मुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये बदल निश्चित

भारतीय संघ टी-२० मालिकेत आघाडीसाठी सज्ज; झिम्बाब्वेविरुद्ध तिसरी लढत आज
Zimbabwe vs India 3rd T20I
Zimbabwe vs India 3rd T20Isakal
Updated on

Zimbabwe vs India 3rd T20I : भारतीय टी-२० विश्‍वविजेत्या संघातील यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन व शिवम दुबे हे शिलेदार झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात दाखल झाले आहेत. अन्‌ याच कारणामुळे दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघात बदल होणार हे निश्‍चित आहे. यशस्वी जयस्वालचा संघातील समावेश पक्का आहे; पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करील, याबाबत अनिश्‍चितता आहे.

यशस्वी, संजू व शिवमच्या समावेशामुळे भारताविरुद्धच्या आज (ता. १०) होत असलेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा कस लागणार हे निश्‍चित आहे. याप्रसंगी दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारतीय संघाने झिम्बाब्वेचा १०० धावांनी धुव्वा उडवला. देदीप्यमान कामगिरी केल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात येईल, असे वाटत नाही. मनोज तिवारी याने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर, तसेच करुण नायर याने कसोटीत त्रिशतक साजरे केल्यानंतर दोघांनाही बाहेर ठेवण्यात आले होते. अर्थात हा होता अपवाद.

शुभमन गिलसह यशस्वी जयस्वाल सलामीला येण्याची शक्यता असून तिसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्माला फलंदाजीला पाठवण्यात येईल. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड व पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसनला फलंदाजी करावी लागेल. यशस्वी जयस्वालसाठी साई सुदर्शनला जागा सोडावी लागणार असून ध्रुव जुरेलऐवजी संजू सॅमसन संघात येईल. रियान परागला बाहेर काढून शिवम दुबेची जागा पक्की करण्यात येईल.

शुभमन गिल फॉर्ममध्ये येण्याची अपेक्षा

भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. त्याच्या फलंदाजी क्षमतेबद्दल कोणतीही शंका नाही; पण पहिल्या दोन लढतींत त्याच्याकडून फक्त ३३ धावाच झाल्या आहेत. याच कारणामुळे उद्याच्या लढतीत त्याच्याकडून मोठी धावसंख्या उभारण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

बिश्‍नोई, सुंदरचा प्रभाव

हरारे स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाज प्रभावी कामगिरी करीत आहेत. येथील खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत आहे. त्यामुळे रवी बिश्‍नोई (६/२४) व वॉशिंग्टन सुंदर (३/३९) या फिरकीपटूंनी ठसा उमटवला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला फिरकीपटूंचे आव्हान परतवून लावता आलेले नाही. उर्वरित लढतींमध्ये झिम्बाब्वेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करावा लागणार आहे.

या खेळपट्टीत दडलंय काय?

पहिल्या टी-२० लढतीत दोन्ही संघांतील फलंदाजांना अपयशाला सामोरे जावे लागले; पण पुढील लढतीत टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मात्र चमक दाखवता आली नाही. आता दोन दिवसांच्या विश्रांतीने होत असलेल्या तिसऱ्या लढतीत खेळपट्टी कोणता रंग दाखवते हे पाहणे रंजक ठरेल. चेंडूला उसळी मिळत असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांकडून चमकदार खेळाची आशा बाळगता येईल.

तिसरी टी-२० लढत

भारत-झिम्बाब्वे, हरारे

संध्याकाळी ४.३० वाजता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.