

IND vs ZIM
esakal
Vaibhav Sooryavanshi: २०२६ हे वर्ष जर कोणासाठी खास ठरलं असेल, तर तो म्हणजे अवघा १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी. आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं. अनेक विक्रम आपल्या नावावर करत त्याने भारतीय संघातही स्थान मिळवलं आणि आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
मात्र, इंग्लंड दौऱ्यावर त्याची बॅट अपेक्षेप्रमाणे तळपली नाही. तीन सामन्यांत त्याला फक्त ४२ धावा करता आल्या. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो नव्या जोमाने मैदानात उतरणार असून एका मोठ्या विश्वविक्रमावर त्याची नजर असणार आहे.