
IND-W vs AUS-W ODI Match : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघाला मालिकेतील पहिल्याच वन-डे सामन्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रिस्बेन मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव ३५ व्या षटकात अवघ्या १०० धावांवर गुंडाळला. ऑस्टेलियाने १०० धावांचे लक्ष्य १६.२ षटकांत पुर्ण केले आणि ५ विकेट्स व २०२ चेंडू राखून सामना जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.