IND A vs NZ A Live : भारतासोबत चिटींग? न्यूझीलंडच्या फलंदाजांचा मैदानावर येण्यास नकार; सामना ड्रॉ करावा लागला; नेमकं काय घडलं?

India A one wicket away from victory against New Zealand A: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना अखेर ड्रॉ राहिला. पहिल्या डावात अवघ्या ११३ धावांत गारद झाल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले.
India A vs New Zealand A final day match controversy

India A vs New Zealand A final day match controversy

esakal

Updated on: 

Why did India A vs New Zealand A first unofficial Test end in a draw? भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातला पहिला कसोटी सामना ड्रॉ राहिला... भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना न्यूझीलंडला बॅकफूटवर फेकले होते... चौथ्या दिवसाच्या पहिल्या स्पेलमध्ये आकिब नबीने तीन विकेट्स घेतल्या.. ३१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा डाव गडगडला होता... शेवटच्या सत्रात भारताला विजयासाठी १ विकेट हवी होती आणि दिवसाची १७ षटकं शिल्लक होती. पण, अचानक न्यूझीलंडचा सलामीवीर कर्टीस हिफी व ११ व्या क्रमांकाचा फलंदाज जेडन लेनॉक्स यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार ध्रुव जुरेलसह खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले. अम्पायरही चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले, परंतु किवी फलंदाजांनी येण्यास नकार दिला आणि भारताचा विजय हिरावला गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com