

India A vs Australia A 3rd ODI
Sakal
India A vs Australia A 3rd ODI: भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाला पुदुचेरी येथे झालेल्या वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ४९ धावांनी पराभूत केले. रविवारी (११ ऑक्टोबर) झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारताने मालिकेत व्हाईटवॉश टाळला आहे. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यातील विजयांमुळे ऑस्ट्रेलिया अ संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यासह ऑस्ट्रेलिया अ संघाचा भारत दौरा संपला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघासमोर २७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ४६.२ षटकात सर्वबाद २२६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून ५ गोलंदाजांनी मिळून विकेट्स घेतल्या.