ENG-LIONS vs IND-A 2nd unofficial Test Day 1 Live : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये शनिवारी दाखल झाले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ इंग्लंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची ही नवीन सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. रिषभ पंत याच्याकडे उप कर्णधारपद दिले गेले आहे, परंतु त्याच्या संघातील स्थानाला आव्हान देणारा खेळाडू तयार झाला आहे. आता गौतम गंभीरला ( Gautam Gambhir) त्याच्या शब्दाला जागावं लागेल आणि सातत्याने कामगिरी करणाऱ्या त्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी लागेल.