ENG-Lions vs IND-A 2nd unofficial Test Day 1 Live Scoreboard : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटीत सलामीला कोण येणार, याचे उत्तर आज लोकेश राहुलनेच दिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही KL Rahul सलामीला यशस्वी जैस्वालसोबत खेळला होता. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितच्या निवृत्तीमुळे लोकेश-यशस्वी हीच जोडी ओपनिंगला येईल हे निश्चित होते. त्यात लोकेशने आज इंग्लंड लायन्सविरुद्ध दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक ठोकले. इंग्लंडविरुद्ध २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी लोकेशने सलामीचे आपले स्थान आणखी भक्कम केले आहे.