IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

India A vs Pakistan A Toss Controversy: भारत अ आणि पाकिस्तान अ सामन्याच्या टॉसवेळी मॅच रेफ्रींकडून चुकीचा निर्णय दिला गेल्याचं दिसलं. अब्दुल समदने नाणं तपासल्यानंतर टॉस पाकिस्तानच्या बाजूने लागला. या घटनेमुळे पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर पक्षपाताचे आरोप केले.
India A vs Pakistan A Toss Controversy

India A vs Pakistan A Toss Controversy

esakal

Updated on: 

India A vs Pakistan A Toss Controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की मैदानावरच्या खेळासोबतच इतर घटनाही चर्चेत येतात. दोहा येथे सुरू असलेल्या रायझिंग स्टार्स आशिया कपमधील भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्यातही टॉसवेळी असाच प्रकार घडला.

नाणेफेकीच्या वेळी मॅच रेफ्रींकडून सुरुवातीला चुकीचा निर्णय दिला गेल्याचं दिसलं. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समद याने स्वतः नाणं पाहिलं आणि टॉसचा निर्णय पाकिस्तानच्या बाजूने लागला. या घटनेनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर पक्षपाताचे आरोप केले.

Loading content, please wait...