INDIA VS PAKISTAN
esakal
India vs Pakistan cricket matches in November 2026 : भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात मोठी मेजवानी आहे. हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकदा नव्हे, तर दोनदान एकमेकांना क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. एकीकडे १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर दुसरीकडे आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे.