India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

India women T20 World Cup 2026 squad full list: आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ स्पर्धेत उतरणार आहे.
India Women's T20 World Cup 2026 squad announcement 15-member squad

India Women's T20 World Cup 2026 squad announcement 15-member squad

esakal

Updated on

India vs Pakistan women match T20 World Cup 2026 date : आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार हरमनप्रीत कौर, बीसीसीआय सचिव देवजित सैकिया आणि निवड समितीच्या मुख्य अमिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय महिला संघ जाहीर केला. इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणारी ही स्पर्धा १२ जूनपासून सुरू होईल. २०२४ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाला फक्त दोन सामने जिंकता आले होते. पण, गेल्या वर्षीच वन डे वर्ल्ड कप जिंकल्यामुळे भारतीय संघ यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास आहे. हरमनप्रीत कौर आणि तिचा संघ १४ जून रोजी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com