Shubman Gill praises Rohit Sharma and Virat Kohli for their experience and key contributions to Team India.
esakal
Shubman Gill statement on Rohit Sharma and Virat Kohli experience: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. आता वन डे संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारताची ही पहिलीच वन डे मालिका आहे आणि रोहित शर्मा व विराट कोहली हे अनुभवी खेळाडू या संघाचा भाग आहेत. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपची तयारी, म्हणून या बदलांकडे व मालिकेकडे पाहिले जात आहे. अशात शुभमनने दोन अनुभवी खेळाडूंबद्दल मोठं विधान केलं आहे.