
Indian cricket team fixtures and opponents for 2025 season:
चला २०२४ वर्षाचा आजचा शेवटचा दिवस... भारतीय क्रिकेट संघाने या वर्षात अनेक चढ उतार पाहिले... भारतीय चाहत्यांची दिवाळी गोड केली, ती ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून. २००७ नंतर भारताने पहिल्यांदाच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. झिम्बाब्वे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला संघ गेला. पण, तेथे संमिश्र कामगिरीवर आपल्याला समाधान मानावे लागले. २०२४ चा शेवट तरी गोड होईल अशी अपेक्षा होती, परंतु कालच मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या कसोटीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.