
BCCI and ECB announce new Test trophy : इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका आता सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर असलेल्या नवीन ट्रॉफीसाठी खेळली जाईल. २० जून रोजी हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी TENDULKAR-ANDERSON TROPHY चे अनावरण केले जाईल. भारताचा महान खेळाडू तेंडुलकर १५,९२१ धावांसह कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि ७०४ बळींसह कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे या दोन महान खेळाडूंच्या नावाने इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत ट्रॉफी दिली जाणार आहे.