India vs New Zealand ODI Series 2026
esakal
IND vs NZ ODI 2026 full schedule live streaming in India : न्यूझीलंड संघ ३ सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमधील वन डे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि पहिला सामना वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वात मोठे सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेतून पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार आहेत. रोहित आणि विराटने कसोटी तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे.