
रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन या तीन सीनियर खेळाडूंच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासाठी पाच कसोटी सामन्यांची मालिका आव्हानात्मक असेल, असा अंदाज भारताचे माजी फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी व्यक्त केला आहे.
या तीन अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात पोकळी निर्माण होईल त्याच वेळी कर्णधारही नवा असण्याची शक्यता आहे. शुभमन गिलची कर्णधापदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जून पासून सुरू होत आहे.