
भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा नुकताच त्याच्या कसोटी निवृत्तीमुळे आणि वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाच्या स्टँडच्या उद्धाटन सोहळ्यामुळे चर्चेचे कारण ठरला होता. रोहित सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
मुंबई इंडियन्सला २१ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध साखळी फेरीतील महत्त्वाचा १३ वा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळवण्याची अपेक्षा असेल.