MS Dhoni Birthday: क्रिकेटर नव्हे, धोनीला व्हायचं होतं तर आर्मीत भरती, स्वत: केलेला खुलासा

MS Dhoni: एमएस धोनीचे आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न होतं.
MS Dhoni | Cricket
MS Dhoni | CricketSakal
Updated on

MS Dhoni Birthday: 7 जुलै रोजी एमएस धोनी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटविश्वात धोनी एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण त्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली आहे. त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.

धोनीने  ज्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या मैदानातून केली होती. माही त्या मैदानात क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळत असे. तो त्याच्या शाळेच्या संघाचा गोलरक्षक होता.

चपळाईने चेंडू पकडण्याच्या त्याच्या शैलीने प्रशिक्षकाला खूप प्रभावित केले. हे पाहून प्रशिक्षकाने आपला विचार बदलला आणि अशा प्रकारे धोनीचे नाव क्रिकेटमध्ये दाखल झाले. यानंतर धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने क्रिकेटमध्येही लोकांची मने जिंकली.

खरंतर,  धोनीचे क्रिकेटर नव्हे तर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते . याबाबत त्याने स्वतः खुलासा केला होता. धोनीने एकदा सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमधील सैनिकांसोबत वेळ घालवला होता आणि त्याला सैनिक बनायचे असल्याचे सांगितले होते.

MS Dhoni | Cricket
MS Dhoni: धाकधूक वाढलं होतं, बड्डे गिफ्ट साठी धन्यवाद.. थालाने टीम रोहितला दिल्या शुभेच्छा, काय म्हणाला धोनी ?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना धोनीने सांगितले होते की,  त्याला उंचीची खूप भीती वाटते. असे असतानाही धोनीने त्यावेळी सैनिकांसोबत फॅन जंपही केले होते. वरून खाली आल्यावर तो म्हणाला की या गणवेशात काहीतरी खास आहे. कदाचित या युनिफॉर्मची जादू असावी की मला अजिबात भीती वाटली नाही.

यासोबतच धोनी म्हणाला होता की,  मला लहानपणापासून सैन्यात भरती व्हायचे होते. तो अनेकदा रांची येथील लष्करी भागात जात असे. तिथे गेल्यावर सैनिकांना पाहून वाटायचे की एक दिवस मीही त्यांच्यासारखा होईन. 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीला भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचे मानद पद देण्यात आले.

MS Dhoni | Cricket
MS Dhoni: धोनी खासदार मनोज तिवारी यांना का म्हणतो 'जीजाजी'? व्हायरल Video मध्ये खुलासा

धोनीने लष्कराचा गणवेशात स्वीकारलेला पद्मभूषण पुरस्कार

धोनीला 2018 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एमएस धोनी मानद लेफ्टनंट कर्नलचा गणवेश परिधान करून गेला होता. एमएस धोनीचे नाव पुकारताच त्याने आर्मी मॅन प्रमाणे जाऊन हा पुरस्कार स्विकारला.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर धोनी म्हणाला होता की,  मला हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला असून हा गणवेश परिधान करून हा पुरस्कार मिळाला ही माझासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.